पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवरसात्मक काव्य

  काव्यातील नवरस [लेखांक 3] 'रसात्मकं काव्यम्' म्हणजे रस हा काव्याचा आत्मा आहे. काव्यात एखादी भावना उत्कर्षाला पोचवणे याला काव्यरस असे म्हणता येईल. शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र व शांत हे मराठी साहित्यातील नव-रस मानण्यात येतात. भक्तिरस हाही आणखी एक रस मानला जातो.  [१] शृंगार रस  यात शृंग म्हणजे कामवासनेचा उद्भव ज्यायोगे होतो, अशा प्रकारच्या काव्यात स्त्री-पुरुषांचे सौंदर्य, राग, अनुराग, चेष्टा, इ. चे वर्णन असते. उदा.१) तुम्हांवर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंगमहाल || पापण्यांची तोरणं बांधुन डोळ्यावरती ही नजर उधळिते काळजातली पिरती जवळी यावं, मला पुसावं, गुपित माझं खुशाल नका सोडून जाऊ रंगमहाल || (लोकनाट्यात सादर केल्या जाणाऱ्या बऱ्याचशा लावण्या शृंगाररसप्रधान असल्या तरी उत्तान आणि अश्लीलतेकडे झुकणाऱ्या असतात.)  शृंगार रसाची अन्य सामान्य उदाहरणे -  दमयंतीचे सौंदर्य.  चापेकळीपरिसही सरलत्व नाकी | जीचा धरी अधर विद्रुम--भावना की || भासे मनात मज बिंबफल-भ्रमाने | की सत्य चंचु-पुट वोढविले शुकाने ! || - ( नल-दमयंती आख्यान - रघुनाथ पंडित )...

मराठी भाषा वैभव - काव्यगुण

 काव्यगुण  [ लेखांक - 2 ] प्रसाद, माधुर्य, ओज हे काव्याचे मुख्य तीन गुण आहेत. 1] प्रसाद गुण -  सहज अर्थप्रतीति होईल अशी शब्द-योजना ज्या रचनेत असते, तिला 'प्रसाद' असे म्हणतात. (अर्थबोध सहज झाल्याने मन प्रासादिक वृत्तीने भरून जाते. अशा रचनेत सामासिक शब्द क्वचितच असतात व असलेच तर अगदी कमी शब्दांचेच.)  उदा. १) सत्यभामा व द्रौपदी यांचे संभाषण- सत्या कृष्णेसि म्हणे, "वदते ते तू खरेच मान सये । लोक म्हणोत परि पळहि माझ्या हाती न कांत-मानस ये"।। कृष्णा हासोनि म्हणे, "भामे, मोहावयासि पतिला जे । मंत्राद्युपाय करणे, या श्रवणे बहु मदीय मति लाजे ।। प्रेमे पति-चरणांसि न देउनि दे हात तायिताला जे । ते स्त्री न रुचे पतिला, की तीते आततायिता लाजे" || ... ( मोरोपंत).  [ सत्यभामा द्रौपदीला म्हणते, “सखे, हे म्हणणे तू खरेच मान.” लोक काहीही म्हणोत; पण माझ्या हाती (उपायांत) कृष्णाचे मन लागत नाही, ते वश होत नाही. द्रौपदी (कृष्णा) हसत म्हणते, “भामे, पतीला वश करायला जे उपाय सांगितले जातात त्या मंत्र, तंत्र, उपायांची मला खूप लाज वाटते. म्हणजेच खरे पतिप्रेम मंत्रतंत्रांनी किंवा युक्त्यांनी...

काव्यविचार

मराठी भाषावैभव — संपादकीय भूमिका १. या ब्लॉगवरील सर्व लेखन मराठी व्याकरण, काव्यशास्त्र, अलंकार, वृत्तविचार आणि पंतकाव्यपरंपरा यांवर आधारित असेल. २. प्रत्येक विवेचन शास्त्रीय आधारावर व प्रामाणिक ग्रंथदाखल्यांसह मांडले जाईल. ३. काल्पनिक उदाहरणांऐवजी शक्यतो मूळ काव्यपंक्तींचा आधार घेतला जाईल. ४. छंद, गणरचना आणि अलंकार यांचा ऊहापोह करताना तांत्रिक अचूकता पाळली जाईल. ५. वाचकांच्या सूचनांचे स्वागत आहे; शास्त्रीय दुरुस्त्यांचा नम्रपणे स्वीकार केला जाईल. ******************************************* काव्यविचार [ लेखांक - 1] १) वाक्यं रसात्मक काव्यम्  २) रमणीयार्थ-प्रतिपादकः शब्दः काव्यम्  ३) गुणालङ्कार-सहितौ शब्दार्थौ दोष-वर्जितौ  ४) काव्यस्य आत्मा ध्वनिः ५) भावनोद्दीपकः शब्दः काव्यम्  ६) कल्पनारम्य आणि प्रतिभासंपन्न वाक्यरचना म्हणजे काव्य! काव्याच्या अशा पुष्कळ व्याख्या निरनिराळ्या ठिकाणी केल्या गेल्या आहेत. त्या सर्वांचा मथितार्थ असा की प्रतिभा, आह्लाद-जनकत्व, रसोत्पत्ति, रमणीयार्थ-प्रतिपादन, ओज, माधुर्य, अलंकार, ध्वनि-सूचकता, भाषा-प्रौढता व सुबोधता, निर्दोषत्व, शब्...