पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समारोप

मराठी भाषावैभव  लेखांक १५ समारोप  मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आरंभलेली “भाषावैभव” ही लेखमाला म्हणजे माझ्यासाठी मायमराठीतील शब्दसंपदेच्या, भावसंपदेच्या आणि काव्यपरंपरेच्या वैभवाचे एक ललित दर्शन घडविणारी यात्रा ठरली. खरं सांगायचं तर एक मिरवणूकच म्हणावं लागेल या प्रवासाला!  काव्याच्या या शोभायात्रेसोबत असताना कधी नादमय शब्दांची लय ऐकू आली, कधी अर्थांच्या गूढ छटा खुलल्या, तर कधी ध्वनीच्या सूचकतेतून काव्याचे गहिरे सौंदर्य अनुभवता आले. प्रसाद, माधुर्य आणि ओज या काव्यगुणांच्या माध्यमातून कवितेच्या अभिव्यक्तीतील निर्मळता, गोडवा आणि तेजस्विता यांचे दर्शन झाले; तर नवरसांच्या रंगमंचावरून मानवी भावविश्वाचे विविध आविष्कार समोर आले. शब्दालंकार व अर्थालंकार यांच्या साजशृंगाराने भाषेला जणू दीप्तिमान आभूषणेच लाभली, आणि काव्यप्रभा अधिकच तेजस्वी झाली. काव्यातील सौंदर्य पाहताना त्यातील दोषांचीही चर्चा करणे ओघाने क्रमप्राप्त ठरलं. मात्र हे दोष भाषेच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी केलेल्या अट्टाहासापायीच उद्भवले होते हे ध्यानात घेतलं की रसिकांना त्याविषयी वावगे वाटत नाही. तरीही च्युतसंस्क...

परभाषेतून आलेले काव्यप्रकार

 भाषावैभव [ लेखांक 14 ]   परकीय वाङ्‌मयांतून आलेली वृत्ते मराठी भाषेचा स्वभावच असा आहे की ती परकीयतेला दूर लोटत नाही, तर तिचे स्वागत करून तिला आपल्या संस्कारांचा स्पर्श देते. विविध भाषांच्या काव्यपरंपरांतून उमललेले काही काव्यप्रकार मराठीच्या अंगणात येऊन स्थिरावले आणि तिच्या काव्यसंपदेचा भाग बनले. उर्दूची नजाकत लाभलेली गझल, चिंतनाचा गूढ ठसा उमटवणारी रुबाई, पाश्चात्त्य काव्यपरंपरेतून आलेले सुनीत, तसेच हिंदी परंपरेतील लयबद्ध दोहा — या सर्वांनी मराठी काव्याला नवे रंग, नवी लय आणि नवे अभिव्यक्तीविश्व दिले. परभाषेच्या मातीत उमललेली ही काव्यफुले मराठीच्या बागेत येऊन फुलली तेव्हा त्यांच्या सुगंधाने मायमराठीचे काव्यवैभव अधिक समृद्ध झाले. त्या विविध काव्यप्रकारांचा परिचय करून देणारा हा लेख म्हणजे मराठी वाङ्मयाच्या या बहुरंगी काव्यपरंपरेचा एक ललित प्रवास आहे. मराठीत प्रामुख्याने गझल व सुनीत हे दोन परकीय काव्य-प्रकार विशेषत्वाने रूढ झालेले दिसतात.  [ १ ]  गझल किंवा रसना गझल हे मूळचे अरबी वृत्त असून, यातील चरणांच्या जोड्या पाच ते सात असतात. यातील सर्व समचरणांच्या जोड्या एक-यम...

विषम जाति-वृत्ते.

 भाषावैभव विषम जाति-वृत्ते [ लेखांक १३ ]  मराठी काव्यपरंपरेतील वृत्तवैविध्य अत्यंत रमणीय आहे. सम-जातिवृत्तांप्रमाणेच विषम-जातिवृत्तेही कवीच्या कल्पनाशक्तीला नवे आयाम देणारी रचना आहे. मात्रा, गती आणि लय यांचे सूक्ष्म भान ठेवून जेव्हा ओळींची रचना एकसारखी न राहता कलात्मकरीत्या बदलत जाते, तेव्हा काव्याला एक वेगळीच चाल आणि मोहकता प्राप्त होते. लयीतील ही विविधता काव्याला नवे चैतन्य देते. अशा या रसपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण विषम-जातिवृत्तांचा परिचय करून घेण्याचा हा प्रयत्न. ✨ [ १ ]  गोविंद [ विवशा ]   ( मात्रा २५ व २६) यात ध्रुवपद (१० + १५) = २५ मात्रांचे असून, कडवे चंद्रकांत जातीचे (८+८+८+२) = २६ मात्रांचें असते.  उदा.  (१) क्षुधित वनीं गोविंद्-बाइगे, क्षुधित वनीं गोविंद्  ।। ध्रु ।। रवितनयातटि शिशुंसह हा व्रज चारित गोधन-वृंद् ।। ...... ( संत एकनाथ ).  (२) 'आली दिपवाळी गड्यांनो - आली दिपवाळी' ........ ( माधवानुज = काशिनाथ हरी मोडक).  (३)  'कृष्ण गडी अपुला - राजा मथुरेचा झाला'  [ २ ] महती ( मात्रा २० व २८) यात (८+८+४) = २० भूपतिवैभवाच्य...

अर्धसम-वृत्ते

अर्धसम-जातिवृत्ते. भाषावैभव (अरुण सौदागर) [ लेखांक 12 ]  अर्धसम-जातिवृत्ते मराठी काव्यपरंपरा ही छंद, लय आणि वृत्त यांच्या सुगंधी फुलांचे एक रम्य उद्यान आहे. या बागेत सम-वृत्ते जशी सममितीचे सौंदर्य प्रकट करतात, तसेच काही वृत्ते अशीही आहेत की ज्यांत समतेसोबतच विविधता बहराला येताना दिसते. लयीच्या या मनमोहक रचनांना अर्धसम-वृत्ते असे म्हणतात. समतेचा आधार आणि वैविध्याची छटा यांचा सुंदर संगम घडवणारी ही वृत्ते काव्याला एक वेगळीच नादमाधुरी प्रदान करतात. मराठी छंदशास्त्रातील या वैशिष्ट्यपूर्ण वृत्तप्रकाराचा परिचय करून घेण्यासाठी अर्धसम-वृत्तांची रचना, वैशिष्ट्ये आणि उदाहरणे यांचा वेध घेणे निश्चितच रसिकांसाठी आनंददायी ठरेल. ✨ अर्धसम-जातिवृत्ते (अष्टमात्रिका) [ १ ]  शशिकान्ति (मात्रा १२ व १८) यांत साकीतील (८+ ४) = १२ मात्रांचा प्रथम भाग असून, दुसऱ्या भागांत (२ + ८ + ८) = १८ मात्रा असतात. देवलांच्या मृच्छकटिकांतील पुढील पद्यावरून हे नाव पडले आहे. उदा.  १)  अवचित या मे,घांनी, - शशि,कान्ति चोरिली, संधि साधुनी ।। ध्रु० ॥ मालक निर्बल, पाहुनि - न्या,वेऽ तयाचें, धन बहुतांनी तैसें या मे...

सम-जातिवृत्ते

 सम-जातिवृत्ते [ लेखांक 11] जाति-वृत्तांच्या विश्वात सम-जातिवृत्ते हा एक देखणा आणि संतुलित प्रकार मानला जातो. लय, मात्रा आणि चरणरचनेतील समत्व यांमुळे या वृत्तांना विशेष माधुर्य लाभते. कवीच्या भावनांना सुबक चौकट देत, काव्याला शिस्तबद्ध गती देण्याचे कार्य ही सम-जातिवृत्ते करीत असतात. या प्रकाराचे स्वरूप, वैशिष्ट्ये आणि उदाहरणांच्या साहाय्याने त्यांची ओळख करून देण्याचा हा अल्प प्रयत्न आहे.  तालाच्या दृष्टीने अष्टमात्रिक तालीय म्हणजे आठ आठ मात्रांच्या एकेका गटानंतर टाळी येणारी व षण्मात्रिक तालीय म्हणजे सहा सहा मात्रांच्या एकेका गटानंतर टाळी येणारी अशी जाति-वृत्ते असतात.  सम-जाति वृत्ते (अष्टमात्रिक) यांत आठ आठ मात्रांचा एक एक गट अशीं अनेक आवर्तने असतात. कमी पडलेल्या मात्रा जरूर तेथे आलापांनी भरून काढतात. [ १ ] बालानंद [अचलगति] (मात्रा १४) यात एकेका चरणात ८ व ६ मात्रांचे दोन गट असतात. कधीकधी अंतरा पद्माचा असतो तर कधी नसतो. बालकवींच्या पुढील पद्यावरून हे नाव देण्यात आले आहे. १)  आनंदी आनंद गडे । इकडे तिकडे, चोहिकडे वरतीं खाली, मोद भरें । वायूसंगें मोद फिरे नभांत भरला दिशां...

मात्रा-वृत्ते (जाति)

मात्रा-वृत्ते (जाति) लेखांक [ १० ]  मराठीत सामान्यतः ज्यांना आपण 'पदे असे म्हणतो , त्यांचा समावेश  मात्रावृत्तात किंवा जाति-वृत्तात होतो. गाण्याच्या वेगवेगळ्या चालींवर व तालांवर त्यांची रचना असल्यामुळे, पदे विविध प्रकारची होऊ शकतात.  प्रामुख्याने एकनाथांच्या वेळेपासून ही पदरचना झालेली दिसत असली तरी त्यांचे  शास्त्रशुद्ध वर्गीकरण करण्याचा मान प्रा. माधवराव पटवर्धन ह्यांच्याकडे जातो. त्यांच्या 'छन्दोरचने' च्या आधारे  इथे  विवेचन केले आहे. (पुढे खुणेने दर्शविलेल्या संज्ञा त्यांनीच दिलेल्या आहेत). मात्रा-वृत्तात किंवा जाति-वृत्तात केवळ पदेच असतात असे नाही. त्यात निरनिराळे रस असणारी किंवा प्रासंगिक कवनेही असतात. वर्णनात्मक गीतांमध्ये 'कटाव', उपदेशपर गीतांसाठी 'फटके', शृंगार-रसासाठी 'लावण्या', वीररसासाठी 'पोवाडे' यांचा समावेश होतो. तर अंगाईगीत, उखाणे, पाळणे, भूपाळी, भजने, आरत्या हे प्रकार प्रासंगिक गीते म्हणून ओळखले जातात.  जाति-वृत्तांमध्ये एकाच मात्रावलीची चरणयुग्मे, दोन वेगवेगळ्या मात्रावलीची चरणयुग्मे आणि. निरनिराळ्या मात्रावलींचे वेगवेगळे चरण ...

छंद

छंद ( लेखांक ९) मराठीत संस्कृत वृत्तांपेक्षा वेगळी अशी स्वतंत्र छंदरचना प्राचीन काळापासून विकसित होत आलेली आहे. लोकजीवनातून उद्भवलेली लोकगीते, स्त्रियांच्या ओव्या इत्यादी प्रकार प्रारंभी वाङ्मयात औपचारिकरीत्या समाविष्ट नसले तरी ते परंपरेने अखंड चालत आलेले आहेत. पुढे त्याच परंपरेतून ओवी व अभंग या रचनांना साहित्यविश्वात मान्यता मिळाली. याच धर्तीवर भक्तिपर परंपरेत आरत्या रचल्या गेल्या; ‘आर्त’ म्हणजे पीडित अंतःकरणाने केलेली ईश्वराची स्तुती, हाक किंवा विनवणी—त्या भावनेतून आरतीचा जन्म झाला. तसेच दिंडी आणि साकी हेही पूर्णपणे मराठी परंपरेत विकसित झालेले छंदप्रकार आहेत. ‘आर्या’ हा छंद जरी संस्कृतातून मराठीत आला असला, तरी त्याची खरी लोकप्रियता मराठी वाङ्मयातच अधिक दिसून येते. या निव्वळ मराठी वृत्तांपैकी ओवी व अभंग यांत अक्षरांचे साधारण नियमन आढळते, तर आर्या, दिंडी व साकी यांत मात्रांचे नियमन आढळते. लोकपरंपरेतून आलेली आरंभीची गीते, स्त्रियांच्या ओव्या तसेच ज्ञानेश्वर-तुकारामांसारख्या संतकवींनी रचलेले ओवी-अभंग हे प्रकार गणवृत्तांच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न झाला असला, तरी त्यांच्या रचनेतील स्वाभा...

अक्षर-वृत्ते

अक्षर-वृत्ते [ लेखांक ८ ] संस्कृतात एका अक्षरापासून सव्वीस अक्षरांपर्यंतची अक्षरगण-वृत्ते आहेत. ( श्री - एकाक्षरी;  स्त्री, मही - द्व्यक्षरी;  पांचाल,  मृगेंद्र  - त्र्यक्षरी, इ. ) ही वृत्ते अर्थदृष्ट्या काव्याच्या दृष्टीने निरर्थक वाटतात. त्यामुळे मराठीतील सहजपणे दिसून येणाऱ्या वृत्तांपैकी आठ अक्षरांपासून तेवीस अक्षरांपर्यंतच्या काही प्रमुख वृत्तांची अधिक माहिती करून घेऊ.  अक्षरगण-वृत्तांचे सम-वृत्ते, अर्धसम-वृत्ते आणि विषम-वृत्ते असे तीन प्रकार आहेत.  १) समवृत्त ज्याच्या चारही चरणांची अक्षरे व लघु-गुरु क्रम समान असतात ते समवृत्त.  २) अर्धसम-वृत्त ज्याचा पहिला व तिसरा आणि दुसरा व चौथा हे चरण समानाक्षरी ते अर्धसम-वृत्त.  ३) विषम-वृत्त  ज्याचे चारही चरण भिन्नाक्षरांचे असतात ते विषम-वृत्त होय.  (मराठीत तुलनेने विषमवृत्ते फारशी प्रचलित नाहीत). [ पुढील वृत्तबद्ध पद्यांमध्ये जिथे यती आहेत तिथे स्वल्पविराम दिले आहेत.] अ) समवृत्त १. अनुष्टुभ् (अक्षरे ८, यती ५) गण -   सूत्र - ( अनुष्टुभ् नेम ना गणी) तमालपिष्टनीलांनी । मेघांनी नभ लिंपिल...

छंदशास्त्र

[ लेखांक ७ ] छन्दशास्त्र  काव्य–वृत्त : प्रस्तावना मराठी काव्यपरंपरेत शब्दांची माधुरी आणि भावांची समृद्धी जितकी महत्त्वाची आहे, तितकीच त्यांना साजेशी लय देणारी वृत्तेही महत्त्वाची आहेत. जणू काव्यरूपी सुरेल वीणेच्या तारांवर ताल धरणारी ही वृत्ते काव्याला गेयता, संतुलन आणि मोहकता प्रदान करतात. कवीच्या भावविश्वाला योग्य आकार देत, शब्दांना लयबद्ध चाल देणारे हे वृत्तशास्त्र काव्याच्या सौंदर्याचा एक अविभाज्य भाग आहे. प्राचीन संस्कृत आणि मराठी काव्यपरंपरेत विविध वृत्तांनी कवींना अभिव्यक्तीची सुबक चौकट दिली आहे. या लेखमालेच्या पुढच्या काही भागात काव्यवृत्तांचे स्वरूप, त्यांची वैशिष्ट्ये आणि कवींच्या रचनांमधील सुंदर उदाहरणे यांचा थोडक्यात परिचय करून घेण्याचा प्रयत्न आहे. काव्याच्या लयीचा हा रम्य प्रवास रसिकांना आनंददायी ठरो, हीच अपेक्षा.  मनोरंजक व कल्पनारम्य अशा प्रकारच्या वाक्यरचनेला काव्य  म्हणतात. काव्य गद्यात असते आणि पद्यातही. मात्र पद्यातील रचनेत पाद म्हणजे चरण असतात. गद्यात ते नसतात, एवढाच फरक. शिवाय पद्यात ताल किंवा लयबद्धता असते. पद्याच्या रचनेत ठराविक नियमांचे पालन केले ...

काव्य-दोष

  [ लेखांक ६ ]  काव्य-दोष काव्याची भाषा शक्यतो शुद्ध, नियमबद्ध आणि सुसंस्कृत असावी अशी अपेक्षा असते. परंतु कधी कधी कवीकडून व्याकरणाच्या नियमांचे पालन  होत नाही. अशा प्रकारच्या व्याकरणदोषाला काव्यशास्त्रात च्युतसंस्कृती असे म्हटले जाते. च्युत’ म्हणजे त्यापासून विचलित होणे. त्यामुळे व्याकरणाच्या नियमांपासून झालेली चूक म्हणजे च्युतसंस्कृती. कवीने लिंग, वचन, विभक्ती, काळ, धातुरूप, संधी इत्यादी व्याकरणनियम पाळले नाहीत तर तो दोष निर्माण होतो. च्युतसंस्कृतीचे स्वरूप हा दोष पुढील प्रकारे दिसून येतो— लिंगदोष – शब्दाचे लिंग चुकीचे वापरणे. वचनदोष – एकवचन-बहुवचन यांचा अयोग्य वापर. विभक्तीदोष – योग्य विभक्ती न वापरणे. धातुरूपदोष – क्रियापदाचे अयोग्य रूप. संधीदोष – संधीचे नियम मोडणे. साधे उदाहरण उदा. सुंदर चंद्र हसती — येथे चंद्र एकवचनी असून हसती हे बहुवचन क्रियापद आहे; त्यामुळे वचनभंग होतो. काव्यातील रस, माधुर्य आणि सुसंगती टिकवण्यासाठी भाषेची शुद्धता पूरक ठरते. व्याकरणाचे नियम मोडले गेले तर काव्याची शोभा कमी होते, म्हणून काव्यशास्त्रज्ञांनी च्युतसंस्कृती हा दोष मानला आहे. मात्र कधी क...